आजकाल इंटरनेट आणि gaming यांचा वापर वाढल्याने परिणामी इंटरनेट gamingचे व्यसन जडत चालले आहे. लहान मुलांपासून ते वायोवृधान्पर्यान्त सगळ्यांच्याच हातात mobile, tabs या गोष्टी दिसतात. mobile ही काळाची गरज असल्याने त्याचा वापर अनिवार्य आहे; पण अतिवापराने त्याचे व्यसन जड्ल्याशिवाय राहत नाही.
international classification of diseases icd 11 gaming disorder म्हणजे game खेळण्याचा असा pattern ज्याच्यामध्ये स्वताचा ताबा सुटतो आणि video gaming आणि digital gaming यांचे प्राधान्य इतके वाढते कि दैनंदिन जीवन विस्कळीत होते, आपल्या आवडी, hobbies नाहीशा होतात, आणि कितीही नकारात्मक परिणाम झाले तरी games खेळणे चालूच राहते किंबहुना ते अधिकाधिक वाढत जाते.
games खेळण्याची तीव्रता इतकी वाढलेली असते कि त्या व्यक्तीच्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, occupational आणि आयुष्य्च्या इतर महत्वपूर्ण आयामानवर विपरीत परिणाम होतो. यामुळेच जगातील निरनिराळ्या भागांमध्ये who ने, शारीरिक आजारांच्या उपचार पद्धती प्रमाणे gaming disorderसाठी सुद्धा वेगवेगळे treamnet plans आणि prevention plans आखलेले आहेत. या आजाराची झपाट्याने होत चाललेली वाढ आणि तीव्रता डॉक्टर्स च्या लक्षात यावी हा who चा त्याला जागतिक आजारांमध्ये समाविष्ट करण्याचा हेतू असावा. यामुळेच जी लोक digital or video games खेळतात त्यांनी आपले games खेळण्याच्या timing वर नियंत्रण आणले पाहिजे खास करून games खेळणे जेव्हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अडथळ आणत असेल किंवा शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर आणि सामाजिक कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करत असेल त्यावेळी लगेचच सतर्क होण्याची गरज आहे. ज्यांना हे नियंत्रण जमले नाही त्यांचे आयुष्य मात्र एक प्रश्नचिन्हाच होऊन बसले आहे.
अशीच एक गोष्ट आहे अभिषेक या मुलाची. आईबाबांना एकुलताएक अभिषेक एक चागल्या घरातला; अतिशय हुशार व सर्वांचा लाडका असा मुलगा. आईवडील अभिनय आणि कला क्षेत्रातले असल्याने त्याच्यत सुद्धा कलेची आवड आणि अभ्य्सातही कुशाग्र बुद्धिमत्ता… दहावीत ९५ टक्के मिळवणारा अभिषेक १२ वीत मात्र ४७ टक्क्यांनी कसाबसा पास झाला ..आज bsc च्या पहिल्या वर्षाला त्याचे शिक्षण थांबले आहे. त्याचे कारण म्हणजे mobile वर games खेळण्याचे व्यसन …८ वी पासून त्याने क्लासला जाण्याऐवजी games parlour ला जायला सुरुवात केली. ९ वीत कधी कधी शाळा बुडवून तो video games साठी games parlour ला जाऊ लागला. त्याचा अभ्य्सात ला इंटरेस्ट कमी होऊनसुद्धा त्याने १० वीत ९५ टक्के मिळवले यावरूनच आपण त्याच्या हुशारीचा अंदाज लाऊ शकतो. ११/१२ वीत मात्र त्याने games खेळण्याच्या नादात मित्राबरोबर मिसळणे, बाहेर फिरणे सोडले आणि अभ्य्सातले लक्ष हि कमी केले. १२ वीत कसाबसा पास झाल्यावर त्याने bsc ला प्रवेश तर घेतला पण; त्याने college attend केलेच नाही. तो १२ ते १५ तास इंटरनेटवर games खेळत बसे. फार्म व्हील, कॅन्डी क्रश पासून असासीन क्रीड, पोकर सारख्या सर्व गेम्स च्या मायाजालात तो अडकला. त्यातल्या लेवल्स पटापट पार करण्यासाठी तो पैसे खर्च करू लागला. त्याचा online games चा महिन्याचा खर्च १५००० रुपयापर्यंत होत असे. तो वडिलांकडून जबरदस्ती करून पैशांची मागणी करू लागला. आईवडिलांना आपल्या मुलाचे असे नुकसान बघवत नव्हते पण ; त्यांना आपल्या मुलाचा नेमका problem काय आहे हे काळतच नव्हते . त्यांनी त्याला मानसोपचारतज्ज्ञ यांच्याकडे दाखवून गोळ्या सुरु केल्या पण त्या घेतल्या नाहीत व डॉक्टर्स आणि समुपदेशकाचे काही ऐकले नाही यामुळे त्याचे व्यसन काही कमी होईना . त्याला nimhans या संस्थेतही bangalor ला admit केले. काही काळ बरे राहून तो पुन्हा इंटरनेट चा आग्रह धारयचा.
अशाप्रकारे निरनिराळ्या रुग्णालयात दाखल होऊनही तो पुन्हा पुन्हा games खेळण्याच्या आहारी जात होता. आईवडील आपल्या मुलाचे सारे हटट पुरवत होते आणि कुठेही त्याला controlled mobile use set न केल्यामुळे frequent relapses होत असावे.
त्याला दीर्घकालीन पुनर्वसनासाठी admit केल्यावर, त्याने बरयाच गोष्टींचा खुलासा केला. त्याने सांगितल्याप्रमाणे, तो MMORPG म्हणजे massive multiplayer role playing games खेळायचा. त्याच्या मते आजची युवा पिढी या games ची शिकार झाली आहे. त्यांना हे games कुठल्याही कामापेक्षा thrilling आणि interesting वाटतात. याचे कारण, हणजे या games मध्ये त्यांना स्वताची identity सापडते व हवे ते interesting करण्याचे स्वातत्र्य मिळते असे त्यांना वाटते. यामध्ये कुठेतरी त्याच्या मुलभूत मानसिक गरजा पूर्ण होतात ;ज्यामुळे त्यांना स्वचछनद पणे games खेळता येतात, इतर गमेर्स शी connect होता येते. यामध्ये त्यांना स्वताचा एक रोल ठरवून दिलेला असतो. त्यामध्ये ते स्वताचे work करून hunting, chasing a character, crafting करत जातात व याचे त्यांना rewards मिळतात. हे rewards किंवा points, real life मध्ये निरुपयोगी असले तरीही त्यांच्या मानसिकतेला challenging आणि pleasurable वाटल्यामुळे त्यांना ,games खेळण्याचे compulsion येते एखाद्या मटका जुगार खेळणाऱ्या माणसाप्रमाणे. १५ते १६ तास ते अथक पणे हे games खेळतात.या सगळ्यात त्यांचा एकलकोंडेपणा वाढतो, कल्पनाशक्तीचा ऱ्हास होतो तसेच बर्याचदा mood swings होतात, चिडचीडपण, अंगावर धावून जाने, मारणे आणि अधिक लक्ष केवळ games च्या achievements वरच असतो.
अभिषेक ला हे सारं सांगताना खूप वाईट वाटत होते.
त्याचा उपचार addiction treatment सारखा होता. व्यसनाधीन व्यक्तीला विथड्रोव्हल्स येतात तसे त्यालाही विथड्रोव्हल्स आले; यामध्ये अस्वस्थ वाटणे,चिडचिड,mood swings, भीती वाटणे, anxiety, उदास वाटणे उदास व दुखी वाटणे. त्याच्या game addiction ची तीव्रता जाणण्यासाठी त्याला problem video game playing questionnaire सोडविण्यासाठी दिल्यावर असे लक्षात आले कि त्याचे व्यसन तीव्र प्रकारचे होते. यामुळे आणि asessmnet sessions मुळे उपचाराची दिशा मिळाली . उपचारादरम्यान औषधे, योग्य सामुपदेशन, 12 step program यामुळे तो आज पुन्हा नव्याने उभा आहे. तसेच group therapy, counselling थेरपी, family therapy, systematic desensitization- behavior therapy, life skill training, insight oriented sessions या सगळ्या उपचारांमुळे सध्याची recovery state तो अनुभवत आहे.
त्याने आता realistic goals plan केले आहेत. तो bsc पूर्ण करून पुढे चांगले आयुष्य जगणार आहे.
college मध्ये तर mobile ची गरज पडेलच, हे लक्षात घेऊन mobile आईवडिलांसमोरच ३०-४५ मिनिटे वापरणे हा पर्याय शोधून तो सुद्धा या गोष्टींकडे कटाक्षाने लक्षे देणार आहे. आज त्याच्या चेहऱ्यावर उद्याची सुंदर ध्येय दिसतात आणि ती पूर्ण करण्यासाठी mobile चा limited वापर करून ती स्वप्ने पूर्ण करण्याची जिद्दही दिसते.
आज पालकांनीही मुलांशी संवाद साधने महत्वाचे आहे. त्यांना हे समजावणे कि social networking, computer games, internet surfingआणि mobile games यामुळे होणारे नुकसान आणि social media var photo ला likes मिळवून लोकांची social media वर appreciations मिळवण्यापेक्षाही reality madhe काम करणे आणि जगणे जास्त महत्वाचे आहे.
काही दिवसांपूर्वीच, blue whale सारखी जीवघेणी gemes चे थैमान माजले होते. आजही mmorpg games आणि social networking ने तरुण पिढीला पोखरून काढले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन who ने त्वरित internet addiction and gaming addiction यांना मानसिक आजार म्हटले आहे आणि त्यावर योग्य उपचार आणि उपाययोजना सुरु केल्या आहेत.
prevention is always better than cure हे वाक्य याबाबतीत महत्वाचे ठरेल आणि आपल्या mobile चे काळजीपूर्वक वापर करणे योग्य ठरेल.