सुनिता { बदललेले नाव } नावाची ३६ वर्षीय महिला तिच्या आई बाबांसोबत आमच्या ओपीडी मध्ये आली. आपल्याच विश्वात गुंग असलेली कल्पना डॉक्टर कडे आणल्यामुळे घरच्यांवर रागावलेली वाटत होती. डॉक्टर शी बोलण्यास किंवा सहकार्य करण्यास ती तयार नव्हती. तिच्या चेहेर्यावर राग ओसंडून वाहत होता. मधून मधून स्वतःशी हसणे व बोलणे सुरु होते. तिच्यातली अस्वस्थता आणि बेचेनी प्रकर्षानी दिसत होती. आमच्यकडे ती संशयी नजरेने पाहत होती व एकसारखी एकाच गोष्ट विचारून लहान मुलांसारखा हटट करून रडत देखील होती. आम्ही तिला थोडावेळ बाहेर थांबण्यास सांगितले व आई वडिलांशी बोलणे सुरु केले.
सुनिता कुशाग्र बुद्धिमत्ता असलेली मुलगी होती व कॉम्पुटर इंगीनीरिंग चे पहिले वर्ष तिने उत्तम मार्कांनी पास केले होते. कॉलेज च्या दुसर्या वर्षापासून ती एकटी राहू लागली. घरच्या लोकांवर संशय घेत म्हणू लागली कि ;ते तोच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवितात. शेजारच्या लोकांबरोबर मिळून तिच्या विरुद्ध कटकारस्थानं रचतात. तिच्या जेवणात विष मिसळतात आणि तिला मारून सगळा पैसा व PROPERTY हडपण्याच्या विचारात आहेत . असेच संशयी विचार तिचे आपल्या कॉलेज च्या वर्गातील मुलांवर असल्यामुळे तिने सगळ्यांशी बोलणे बंद केले व काही महिन्यात कॉलेज ला जाणेही बंद केले. स्वतःच्या खोलीत ती एकटीच बसून राहत असे व तिच्या वस्तूंना कुणाला हात लाऊ देत नसे.कुठे येणे जाने नाही, कुठला सण समारंभ नाही. स्वतःचे एक वेगळे विश्वाच निर्माण केले होते तिने!
लहानपणापासून ती अतिशय शिस्तबद्ध, नीटनेटकी व प्रत्येक गोष्ट अगदी वेळच्यावेळी करणारी होती. तिचे सगळे सामान, पुस्तके वैगेरे अतिशय नीट ठेवलेली असायची, त्यातील क्रमवारी बदल झालेला तिला आवडत नसे. अतिशय हट्टीपणा व स्वभावातील ताठरता यामुळे तिचे खूप ठराविकच मित्र होते. तिच्या आईच्या हे निदर्शनास आले कि; सुनिता चे हे स्वभाव गुणधर्म वाढत चालले आहेत . तिचा स्वछता प्रिय स्वभाव आता अती स्वछ्तेकडे वळत होता. तासंतास हात धुणे, दोन ते तीन तास अंघोळ करणे, सारखी भांडी घासत बसणे, घर पुसणे आणि असे न झाल्यास ती चिडचिड करत असे व प्रसंगी अंगावर धावून येत असे ; ह्या गोष्टींमुळे घरच्यांची तिच्याबद्दलची काळजी वाढत चालली होती. सुनिता च्या अजून काही लक्षणे जी बाबांनी नुकतीच पहिली ती म्हणजे; मोजून पावले टाकणे, दात घासतान ४०ते ५० वेळा मोजून तोंडातून टूथब्रश फिरवणे ; वारंवार एकाच गोष्टीच्या मागे लागून तीच तीच बोलत राहणे; वहीत एकसारखे शब्द लिहून असंबद्ध भाष्य तयार करणे.
या सगळ्यामुळे तिचा पूर्ण वेळ स्वच्छतेत जात होता व संशयी वृत्ती मुले तिने स्वताला एकलकोंडे बनवले होते. तिने घरचे जेवण कराणे बंद केले होते;यामुळे तिची तब्बेत ढासळत चालली होती. रात्रीची झोप कमी झली होती कारण ती अदृश्य कुनाशितैर बोलत असे व कधी तर जोर जोरात हसत असे.यामुळे तिचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन मागील काही वर्षा तिच्या अजाराची तीव्रता खूप वाढली होती.
आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला निवासी उपचारच योग्य होता. सुरुवातीला औषधे देऊन तिचे रोजचे ROUTINE स्थिर करण्यावर भर दिला होता. MEDICINES मुळे ती झोप व जेवण सुधारले. तिने स्वताची काळजी घेणे व नियमित व्यवस्थित जेवण करणे सुरु केले. सकाळी ७ वाजता याग करणे,नंतर DAYCARE ला जाने या गोष्टीना तिने सहकार्य करण्यास सुरुवात केली. तिच्या पहिल्या FAMILY MEETING ला तिची प्रगती बघून आईचे डोळे पाणावले. त्यांनी तिला LONG TERM TREATMENT देण्याचा निर्णय घेतला. अशा उपचारामुळे DOCTOR COUNSELLOR यांचे नियमित मार्गदर्शन लाभल्याने व ओशाधांचा डोस नित गेल्याने तिची उल्लेखनीय सुधारणा झाली.
६-८ महिन्याच्या कालावधीत सुनिता खूप बदलली होती .तिचा संशय पूर्णपणे नाहीसा झाला होता.वारंवार एकाच गोष्ट करणे व अतिस्स्वच्छता यांचे प्रमाण बरेच कमी झाले होते. तिच्या वारंवार येणाऱ्या obsessive विचारांना कमी करण्याचे COUNSELLING तिला खूप मदत करत होते. याशिवाय DAY CARE मध्ये कौशल्यपूर्ण काम ती करत होती यामुळे तिचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढत होता.तसेच DAYCARE मधील GROUP THERAPY मुले ती सगळ्यांसमोर वाचन करणे,नाटक,दांचे,स्वताच्या भावना व्यक्त करणे हे देखील शिकत होती.
तिच्या उपचारात या महत्वाच्या गोष्टींचा समावेश होता त्या म्हणजे; योग्य ओषधे ,वैयक्तिक समुपदेशन , GROUP THERAPY,FAMILY THERAPY, MUSIC THERAPY,DANCE THERAPY, YOGA आणि अतिशय महत्वाचा कौटुंबिक आधार. यामुळे कल्पनाला तिच्या आजाराची INSIGHT आली व तिला ओषधांचे महत्व पटले. यानंतर तिला सुट्टी मिळाली पण महत्वाची गोस्त म्हणजे तिने आपले ROUTINE व्यावास्थित सुरु ठेवले. नियमित OPD FOLLOW UP ठेवला. यामुळे तिचा आजार खूप वाढला नाही.
SCHIZO OBSESSIVE हा आजार स्चीझोफ्रेनिया या आजाराचाच एक भाग आहे असे म्हणता यईल. त्यामुळे बहुतांशी हा आजार पूर्णपणे बरा जरी होत नसला तरी औषधे व समुपदेशाने उत्तमपणे आटोक्यात राहू शकतो.
Early diagnosis and regular treatment is key to success in mental illness.